दारु पासून दूर! पण कसे?

आपल्या आयुष्याची होळी करणार्या व आपल्या शरीरात ७२ रोगाचा दवाखाना बनविणारे दारूचे व्यसन जगातील कुठल्यहि औषधाने तसेच डॉक्टर, तांत्रिक-मांत्रिक, बाबा महाराज यांच्याकडे जाऊन, गंडे दोरे बांधुन, शपथ घेऊन , भिति देवुन , किंवा व्यसन मुक्ती केंद्रात ॲडमीट करुन सुटणार नाही

असे अनेक प्रकारचे उपाय करुन काही व्यक्ती दारू सोडविण्यासाठी प्रयत्न करतात . पण किती दिवस ? फक्त महिना, दोन महिने, सहा महिने, पण पुन्हा काही दिवसातच कुठलातरी बहाणा मिळाला कि पुन्हा दारू पिणं सुरू होतं . असे का होते? दारू सोडायची मनापासुन इच्छा असून देखील दारू का सुटत नाही? याकडे आजपर्यत आपले लक्ष कोणीही वेधले नव्हते.

- मग दारू का सुटत नाही?

1 .डोपामाइन 2 .सेरॅाटोनीन 3 .एंडार्फीन

वरील ह्या न्युरॅांसचा दारूशी संपर्क आला की, त्या व्यक्तीस काही क्षणापुरता त्याच्या शरीरात अतीशय प्रमाणात उत्साह वाढतो , एक वेगळाच आनंद नीर्माण होतो , काही क्षण कोट्याधीश असल्याचा भास त्याला होतो , जगात सर्वात श्रीमंत मीच असे खोटे अनुभव दारू प्यायल्यामुळे येतात , अंगात प्रचंड ताकद वाढल्याची खोटी भावना नीर्माण होते . आणि दारूची नशा हळू हळू कमी झाली की हा खोटा आनंद , हा उत्साह कमी होतो।

मग हा आनंद अनुभवण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा पुन्हा दारु पीते , कालांतराने दारुमुळे ब्रेन्मधील काही पेशी हळुहळू ब्लॉक होतात, व त्या व्यक्तीने दारु नाही प्याली तर त्याचे हातपाय थरथरतात, शरीराला घाम येतो , झोप येत नाही , भूक लागत नाही , काही खाल्लं पिल्लं तर उलटी होते , चक्कर येते अंगाला खाज येते , डोकं दुखते ,फिट्स येते , कानात आवाज येतात , चमत्कारी भास होतात, कुणीतरी मारायला आले, चोर आले, अंथरुणात साप किंवा ढेकण दिसल्याच भास होतात असे अनेक प्रकारचे मानसिक परिणाम होतात. यालाच अल्कोहोलिक हॅलोसीनोसीस म्हणतात. वरील ह्या सर्व घातक समस्या ब्रेन्मधील न्युरोट्रन्समिटरवर परिणाम झाल्यामुळेच होतात. हे सर्व दारूमुळेच झालेले असते. त्यामुळे शरीरातील या पेशी दारू प्यायल्याशिवाय काम करीत नाहीत.

याच कारणामुळे ती व्यक्ती दारू सोडायची इच्छा असूनदेखील शरीराला त्रास झाला कि पुन्हा पुन्हा दारू पिते.

तर मग मीत्रांनो यावर अखेर उपाय काय? दारू कशी सुटेल?

7083633131
9730848487
9730848504

पत्ता - मु. पो. तुसे, ता .वाडा , जिल्हा पालघर- ४२१३०३

Our Treatment Method in brief

आमच्या उपचार पद्धतीची थोडक्यात माहिती

१) दारूचे दुष्परिणाम मनुष्याच्या शारिरीक, मानसिक आरोग्यावर व कुटुंबियावर देखील घद्तत. त्याचबरोबर त्याचे समाजातील स्थानही ढासळते. याचा प्रामुख्याने विचार करून व्यसनाचे उपचार या तीनही गोष्टींच्या अनुषंगाने केले जातात.

२) दारूचे सेवन करणार्या बद्दलची ओढ कमी करण्याशाठी दारू पिणार्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेकडे विशेष लक्ष दिले जाते. तिया मध्ये व्यसनी व्यक्तीची बालपणा पासून ची संपूर्ण मानसिक जडनघडण व त्याची मानसिक अवस्था समजून घेऊन व त्या व्यक्तीमत्वामधील कोणत्या कारणामुळे अथवा कमतरतेमुळे ती वयक्ती दारूच्या आहारी गेलेली असावा व त्या व्यक्तीच्या परिवारातील व मित्रमंडळीतील कोणत्या व्यक्तीच्या आणि परिस्थितीतील कोणत्या घटक्याचा त्याचा मानसिक आरोग्याचा दृष्टीने महत्वाचा वाटा आहे या सारख्या प्रश्नांची उत्तरे शिधून व्यसनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक स्वयंपूर्ण व आरोग्यसंपन्न होईल याकडेदेखील विशेष लक्ष दिले जाते. दारू पिणाऱ्या व्यक्तींना दारूच्या दुष्परिणामांचा शारीरिक व मानसिक परिणाम होऊन काही भयानक विकार जडले असल्याची शक्यता अनेकदा असते. म्हणून संवादातून समस्या समजून घेणे व ह्या समस्या सोडविण्यासाठी तसेच वर्तणुकीत व सवयीत बदल घडविण्यासाठी, चिंतातूर वृत्ती, भित्रेपणा इत्यादी मानसिक विकार दूर करण्यासाठी काही महत्वपूर्ण असे प्राकृतिक उपचार सुचविले जातात.

३) व्यसनी व्यक्ती व तिचे कुटूंबिय यांना देखीलमानसिक आणि भावनिक आधार व व्यरानमुक्तीबदलचे महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले जाते. कारण व्यसनी व्यक्तींचे मानसिक बाल घेतलेले असते. यासाठी त्याची त्याची पत्नी, मुले, पालक यांचे मनोधैर्य वाढवून व्यसनी व्यक्तीस समजावून घेण्यास शिकविले जाते.यासाठीच त्याचे कुटूंबीय त्याचबरोबर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दारू पिणाऱ्या व्यक्तीचे अंक बहाणे असते. उद. मला टेंशन आहे. दिवसभर काम करतो त्या मुले थकवा येतो, झोप येत नाही, नोकरी धंदा नाही, पत्नी भांडते, पतीपत्नी संशय वृत्ती, मला कुणीच समजावून घेत नाही, मी काही रोज दारू पीत नाही. कधी कधी पितो व म्हणतो मला कुणीतरी जेवणात किंवा कशात तरी खायला घातले. माझ्यावर कुणीतरी करणी, जादुटोणा किंवा भानामाई केले आहे. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी मला कुणीतरी दारूकडे आपोआप ओढते. तर बंधुनो लक्षात ठेवा हे दारू पिण्यासाठी खोटे बहाणे आहेत. असले प्रकार जगात कुठेही नाहीत आपणच आपल्या चुकीच्या विचारांने आपल्या पायावर धोंडा मारून देतो व जगाला दोष देतो.

तर सज्जनहो! लक्षात ठेवा वरील कुठलीही समस्या व टेंशन असेल यासाठी दारू पिऊन किंवा जगातील कुठल्याही तांत्रिक, मांत्रिक, बाबा, भागात, साधू महाराज, देवऋषी यांच्याकडे जाऊन ह्या समस्या केव्हाही मिटणार नाहीत. तर आणखीनच वाढत जातात हे अटळ सत्य आहे. बंधुनो! आपणास दारू सोडायची पूर्ण इच्छा असेल व वरील माहिती आपणास मनापासून पटली असेल तर आमच्या फोनवर संपर्क करून आत्ताच अपॉईंटमेंट घ्या.

Please be advised

महत्वाचे सूचना

१) फोन करून अपॉईंटमेंट घेणे गरजेचे आहे.

२) दारू सोडायचीच हि ज्या व्यक्तीची मनापासून तयारी नसेल त्या व्यक्तीस आमच्या दारू मुक्ती केंद्रात फसवून मारहाण करून जबरदस्तीने ओढाताण करून आणू नये.

३) आमच्या दारूमुक्ती केंद्रात येताना आपल्याबरोबर आपली धरम्पात्नी, मग्न झाले नसेल तर आई किवा सख्खी बहिण तसेच त्याचबरोबर आपल्या घरातील सुशिक्षीत जबाबदार अशी पुरूष व्यक्ती बरोबर घेऊन येणे अत्यंत आवश्यक आहे.

४) आमच्या दारूमुक्ती केंद्रात येतांना चोवीस तास आगोदर दारू न पीत यावे.

५) मी श्री देशमुख असे निवेदन करतो की, मी कुठल्याही प्रकारचा डॉक्टर, वैदु, हकीम किंवा तांत्रिक, मांत्रिक , बाबा, भगत नहि. माझ्याकडे कुठल्याही प्रकाची दैवी शक्ती नाही.

६) कुठल्याही गुरुवार किंवा रविवार ११:०० वा. येणे.